मंगळवेढा बसस्थानकात मंगळवेढा - अरळी या बसमध्ये महिला प्रवासी चढत असताना अज्ञात चोरटयाने अडीच तोळा वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे गंठण चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे.या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी जयश्री शंकर अभंगराव (वय ४५ रा . पंढरपूर) या मंगळवेढा येथे दि २५ रोजी दुपारी १.३० वा. अरळी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटयांनी फिर्यादीच्या पर्समधील ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळा वजनाचे सोन्याचे गंठण फिर्यादीच्या संमतीवाचून चोरून नेले आहे. याचा तपास पोलिस हवालदार नामदेव कोळी करीत आहेत.
दरम्यान ,यापुर्वी महिलांच्या गळयातील दागिने पळविण्याचा प्रकार अनेक वेळा बसस्थानकावर घडला आहे. याबाबत केवळ तक्रारी दाखल करून घेतल्या जातात मात्र त्याचा तपास लावण्यात पोलिसांना अदयापही यश न आल्याने नागरिक पोलिसांच्या कर्तव्यावर संशय व्यक्त करीत आहेत.
नागरिकांनी वेळोवेळी पोलिस अधिकाऱ्याकडे बसस्थानकावर पोलिस नेमण्याची मागणी केली असतानाही त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
मंगळवेढा बसस्थानकावर फिरता सी.सी.टि.व्ही . कॅमेरा बसविला आहे. मात्र एस.टी. त चढताना महिलांच्या गळ्यातील दागिने चोरतानाचे चित्र त्या कॅमेरात कैद होत नसल्याने चोरटयांचे फावत आहे. अनेक वेळा चोरटे हे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यानच आपला डाव साधत असल्याचे अनेक चोरीच्या घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे सध्या पोलिस व होमगार्ड यांचे संख्याबळ वाढले असतानाही बसस्थानकाकडे कर्मचारी नेमण्यात कुचराई का केली जाते असा संतापजनक सवाल प्रवासी वर्गातून विचारला जातो आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा