मंगळवेढ्यात पुन्हा घरफोडी ४० हजाराचा ऐवज लंपास - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

मंगळवेढ्यात पुन्हा घरफोडी ४० हजाराचा ऐवज लंपास


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी घरातील एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे . 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

याबाबत अधिक माहिती अशी की , अशोक रामचंद्र जगताप व त्यांची पत्नी हे दोघेजण मरवडे येथील घरास कुलूप लावून भोसे येथे गेले असताना २७ डिसेंबर रोजी दुपारी १ . ३० ते दि . २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ . ०० चे दरम्यान अज्ञात चोरटयाने लावलेले कुलूप व दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले रोख २० हजार रुपये , १० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ , १० हजार रुपये किमतीची सोन्याची ठूशी असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा ऐवज त्यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद अशोक जगताप यांनी पोलिसात दिली आहे . 


पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द भा . दं . वि . सं . कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत .







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा