महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके, आमदार संजय शिंदे,काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.तर आ.भारत भालके यांची वर्णी लागेल अशी आशा कार्यकर्त्याना आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज सोमवारी विस्तार होणार आहे.
राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते.भालके यांनीही हॅटटिक साधली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल,असे मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील भालके समर्थकांना वाटते.
या समर्थकांमध्ये रविवारी कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. जिल्ह्यातील समविचारी नेत्यांची मोट बांधणारा नेता म्हणून आ.भारत भालके त्यांना मंत्रिपद मिळेल,अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे . भालके समर्थकही मुंबईच्या निरोपाची वाट पाहत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा