मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे भरदिवसा सकाळी ८.३० वाजता रुद्र स्वामी या विद्यार्थ्याच्या कानातील सोन्याचे कुंडल चोरण्याचा प्रयत्न फसला आहे मात्र या चिमुकल्याचा कान फाटला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
सविस्तर माहिती अशी की,रुद्र स्वामी हा आज सोमवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर बसची वाट पाहत होतो. रस्त्यावर जाणाऱ्या दोन चाकी मोटारसायकलवरून अज्ञात दोन चोरट्यांनी गाडी थांबवून मुलांच्या कानातील सोन्याचे कुंडल चोरण्याचा प्रयत्न केला होता,यामध्ये लहान मुलाचा कान फाटला असून मोठी जखम झाली आहे.
दरम्यान रुद्र स्वामी या चिमुकल्याने आरडाओरड सुरू केल्याने लगेच आसपासची लोक आलेले पाहून अज्ञात चोरटे पळून गेल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा