मंगळवेढा पंचायत समितीचा सभापती, उपसभापती कोण? आज फैसला - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मंगळवेढा पंचायत समितीचा सभापती, उपसभापती कोण? आज फैसला



मंगळवेढा : समाधान फुगारे 

मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज फैसला होणार असून सकाळी 10 ते 12 या वेळेत सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर निवड प्रक्रिया दुपारी दोन वाजता बोलावलेल्या विशेष सभेमध्ये सुरू होईल. सभापती- उपसभापती पदासाठी आलेल्या अर्जांचे वाचन केले जाईल. त्यानंतर अर्जांची छाननी करून वैध अर्ज निश्‍चित केले जातील. त्यानंतर माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्यावेळी एकापेक्षा जास्त अर्ज राहिले तर त्यासाठी मतदान घेतले जाणार आहे. पहिल्यांदा सभापती पदासाठी तर दुसऱ्यांदा उपसभापती पदासाठी मतदान होणार आहे. 


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले. सभापतिपदावर मात्र आवताडे गटाचा वरचष्मा राहणार, हे मात्र नक्की असले तरी सौ.प्रेरणाताई सुधाकर मासाळ यांचे नाव जवळपास निश्चिंत मानले जात आहे.


सौ.उज्वला मस्के देखील या शर्यतीत असून त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे मात्र उपसभापती पदासाठी नितीन पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा