डॉ.तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने शैला गोडसे यांचा राजीनामा - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

डॉ.तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने शैला गोडसे यांचा राजीनामा



मंगळवेढा : समाधान फुगारे

शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज होऊन शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक पदाचा शैला गोडसे यांनी राजीनामा दिला आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. 



जिल्हा संपर्कप्रमुख माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत  यांची निवड होऊ शकली नाही याचे दुःख झाले आहे. गोरगरिबांना, शेतकरी /कष्टकरी ,वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्षा कडे बघितले जाते तसेच दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये रोखठोक व  धाडसी नेतृत्व असलेले डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षापासून शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून मी जबाबदारी पार पाडीत आहे.

मागील काही वर्षांमध्ये आपल्याकडून तानाजीराव सावंत यांनी ताकद देण्याचा प्रयत्न झाला .आपण कमी कालावधी साठी का होईना त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले आपण दिलेल्या ताकदीचा उपयोग आम्हाला सावंत यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत होता. त्यानी सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. 

जनतेच्या प्रश्नासाठी उपोषणे केली, आंदोलने केली, रास्ता रोको केले, पक्ष उपयोगी  अनेक कार्यक्रम राबवले,ते केवळ आणि केवळ सावंत  यांनी दिलेल्या ताकदीचा मुळेच शक्य झाले होते.

आता आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ तयार झालेले असताना मंत्री मंडळांमध्ये आमदार तानाजीराव सावंत यांना  स्थान मिळू शकले नाही त्यामुळे आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटत आहे कारण मी स्वतः व या जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिक थेट आपल्या पर्यंत नेहमी संपर्कात राहणे किंवा पोहोचणे शक्य होत नाही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आता कुणा मार्फत प्रयत्न करायचे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा