मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती पदी आवताडे गटाच्या सौ.प्रेरणा सुधाकर मासाळ तर उपसभापती सूर्यकांत ढोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मंगळवेढा पंचायत समिती सभापती पदासाठी अवताडे गटाकडून प्रेरणा मासाळ व उपसभापती पदासाठी सूर्यकांत ढोणे यांनी अर्ज दाखल केले होते तर भालके गटाकडून सभापतीपदासाठी कल्पना गडदे व उपसभापती पदासाठी नितीन पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता पण या निवडणुकीतून कल्पना गडदे व नितीन पाटील यांनी माघार घेतल्यामुळे अवताडे गटाच्या सभापतीपदी प्रेरणा मासाळ व उपसभापतीपदी सूर्यकांत ढोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी काम पाहिले तर निवडीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बबनराव आवताडे व खरेदीविक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे,सभापती सोमनाथ आवताडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा