मंगळवेढ्यात दोन दुकानास आग, लाखोंचा मुद्देमाल जळून खाक - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १ जानेवारी, २०२०

मंगळवेढ्यात दोन दुकानास आग, लाखोंचा मुद्देमाल जळून खाक



मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा शहरातील दामाजी मंदिर परिसरात श्री.संत दामाजी मोटार रिवारडींग या दुकानास बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत शेजारील दोन दुकानाचेंही मोठे नुकसान झाले आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

अधिक माहिती अशी की,  दामाजी मंदिरा पाठीमागील बाजूस चौगुले यांचे संत दामाजी मोटार रिवारडींग नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री ते दुकान बंद करुन घरी गेले होते. मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुकानात अचानक शॉटसर्किट होऊन आग लागली. या आगीत चौगले यांच्या दुकानातील मोटरीची वायर,मोटर तसेच विविध साहित्य जळून सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. 


यावेळी शेजारील दुकानातील जळून सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या वतीने आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा