मंगळवेढ्यात दारूचे दुकान फोडून वीस हजारांचा मुद्देमाल पळविला;पोलिसांची वाढली डोकेदुखी - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

मंगळवेढ्यात दारूचे दुकान फोडून वीस हजारांचा मुद्देमाल पळविला;पोलिसांची वाढली डोकेदुखी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

नववर्षाच्या पहाटे चोरट्यांनी बोराळ नाक्यावर असलेले देशी दारू दुकान फोडून चौदाशे चाळीस  रुपये किमतीच्या सहा दारू बाटल्या,पाच हजार रुपये किमतीचे तीन सी.सी टीव्ही कॅमेरे ,चार हजार रुपये रोख रक्कम चलन असा एकूण 20 हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

घटनेची हकीकत अशी बोराळे नाक्यावर देशी दारूचे दुकान असून दिनांक 1 च्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी बंद देशी दारु दुकानाची लाकडी दरवाजे कुलूप तोडून आत प्रवेश करून तीन सीसीटीव्ही कॅमेरे व सर्वर बॉक्स रोख रक्कम 750 मिली देशी दारूचे हा कंबे असा एकूण दोन हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केला. याची फेऱ्यात मॅनेजर भीमाशंकर परसाप्पा बंदपट्टे यांनी पोलिसात दिल्यावर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


दरम्याननववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरातील बोराळे नाक्यावर पोलिसांचा फिक्‍स पॉइंट असताना हाकेच्या अंतरावर दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले असा सवाल नागरिक करत आहेत. 

गेल्यावर्षी 31 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी दारूचे दुकान फोडले होते. गेल्यावर्षी चोरटे अजूनही न सापडल्याने चोरट्यांनी पुन्हा चोरीची धाडस केले आहे.चोरट्यांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरे काढून नेले आहेत पोलिसांना शोध घेता येऊ नये या दृष्टीने कॅमेरे पळविली आहेत अशी चर्चा होत आहे, ही चोर पोलिसांच्या पुढे एक पाऊल जाऊन चोऱ्या करत असल्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना आव्हान ठरत आहे.

शहर बीटला नव्याने दाखल झालेले सहाय्यक फौजदार या चोरीचा छडा लावणार का असा सवाल शहरवासी मधून केला जात आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा