मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
माचनूर येथून मंगळवेढ्याकडे येत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन संदीप धनाजी डोके (वय.२३ रा.माचनूर) हा मयत झाला असून लअतुल पवार (वय.२५ रा.ब्रम्हपुरी) हा गंभीर जखमी झाला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588 214 814
ही घटना मंगळवेढा-कारखाना रोडवर असणाऱ्या येताला नागणे यांच्या शेताजवळ रात्री ९ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवेढाकडे जात असताना ट्रॅक्टर येताला नागणे यांच्या शेता जवळ आला असता ट्रॅक्टर पलटी झाल्याने संदीप डोके हा मयत झाला आहे. जखमी अतुल पवार यास मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा