मंगळवेढा तालुक्यात ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी जिरायत बागायत व फळ पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्प्यात 48 गावातील 14 हजार 868 खातेदार शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 63 लाख 6 हजार 816 रुपये प्राप्त झाले असून पुढील आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातील अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिले आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मंगळवेढा तालुक्यात ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात 35 गावच्या बाधित खातेदारांना प्राप्त झाल्याने तो संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. नुकतेच दुसऱ्या टप्प्यातील 48 गावातील बाधित 14 हजार 868 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 63 लाख 6 हजार 816 एवढी रक्कम महसूल खात्याकडे नुकतीच प्राप्त झाली आहे. अनुदान प्राप्त गावांची नावे पुढील प्रमाणे लेंडवेचिंचाळे, मारोळी, हाजापुर ,पाटखळ, मेटकरवाडी, जित्ती, खवे, मारापुर, शेलेवाडी घर्निकी अकोले देगाव बठाण,मानेवाडी पडळकरवाडी लोणार नंदेश्वर, रेवेवाडी खडकी माचणूर , रहाटेवाडी,तामदर्डी गणेशवाडी ,भोसे, भालेवाडी, नंदुर ब्रह्मपुरी तळसंगी कात्राळ हुलजंती, आदी गावासाठी दुसऱ्या टप्प्यातली प्राप्त झाला असून प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ते पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते असे सांगण्यात आले आहे, दरम्यान अतिवृष्टीमुळे क्षेत्रातील 84 47 शेतकरी बागायती क्षेत्रातील 55 95 शेतकरी तर फळ पिके 826 शेतकरी 14 868 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा