मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शाळेला जात नसल्याच्या कारणाने वडिलांनी रागावल्याने मरवडे येथील ७ वर्षीय राज दत्ता शिवशरण हा घरातून न सांगता निघून गेला त्यास मंगळवेढा पोलिसांनी मरवडे-येड्राव रोडवर असलेल्या कॅनॉलमधून शोधून पालकांच्या शोधीन केले पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पहिल्या इत्तेत शिकणारा राज शिवशरण हा गेल्या तीन चार दिवसांपासून शाळेत न गेल्याने वडिलांनी शाळेत का गेला नाही म्हणून रागावले असता या रागातून तो सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेला वडिलांनी व नातेवाईकांनी त्यास सर्वत्र शोध सुरू केला असता तो मिळून आला नाही.
नातेवाईकांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क केला असता फिर्याद सुरू असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन खटके,हवालदार सुनील गायकवाड, हरिदास सलगर,राजाराम तानगावडे यांनी याचा शोध सुरू केला काही तासातच त्याचा शोध लागला आणि बेपत्ता मुलाला नातेवाईकाकडे सुपूर्त केले आहे.
यावेळी गोपनीय विभागाचे राजकुमार ढोबळे,सुनील शिंदे, बाळू शेंबडे, प्रशांत केंगार, दत्ता शिवशरण,अजित शिवशरण आदीजन उपस्थित होते.पालकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा