गर्भपात प्रकरणी डॉ.मर्दा व दोन महिलांच्या पतींना शनिवारी जामीन मिळाला.त्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी याप्रकरणी रविवारी दुपारी सातारा व सांगली जिल्ह्यात छापा टाकून डॉक्टर व सोनोग्राफी सेंटर चालक अशा दोघांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
सोनोग्राफी सेंटर चालविणारे डॉ.विलास दिगंबर सावंत (वय ५०,रा.म्हसवड),डॉ.सुहास बाबर (वय ३८,रा.येडे,ता.कडेगाव,जि.सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गर्भपात प्रकरणातील एक महिला सातारा जिल्ह्यातील होती. तिने सोनोग्राफी कुठे केली याचा तपास करताना डॉ.सावंत ,डॉ.बाबर हे एजंटमार्फत गर्भवतींना डॉ.श्रीकांत मर्दा यांच्याकडे पाठवत होते,हे आढळले.
पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील म्हसवड , सांगली जिल्ह्यातील येडे येथे छापा टाकून ताब्यात घेतले.या गुन्ह्याचे दोषारोपपत्र आतापर्यंत न्यायालयात दाखल झाले नाही. शनिवारी या गुन्ह्यातील डॉ.मर्दा यांच्यासह तीन संशयितांना जामीन मंजूर झाला आहे.
एक संशयित न्यायालयीन कोठडीत आहे . उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी दोन पथके तयार नेमली होती.पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अनिल गाडे यांच्या पथकाने सातारा व सांगली जिल्ह्यात छापा टाकल्याने खळबळ उडाली . यामुळे या प्रकरणात सातारा , सोलापूर , सांगली जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करणारे सेंटर , एजंट व अनेक डॉक्टरांचे एक मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.
दरम्यान , सातारा , सांगली जिल्ह्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रात्री उशिरा मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणण्यात आले . रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा