मंगळवेढा येथील अवैध गर्भपात प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

मंगळवेढा येथील अवैध गर्भपात प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील कुंभार गल्लीत डॉक्टर श्रीकांत मर्दा यांचे नर्सिंग होम येथे महिलांचे अवैधरित्या गर्भपात करताना पोलिसांनी छापा टाकला होता. व  तेथे अवैधरित्या गर्भपात होत असल्याची बाब उघडकीस आली होती.त्यामुळे डॉक्टर मर्दा यांच्यासह दोन महिलांचे पती अमोल काशीद व  प्रकाश गोडसे यांना दि १२/१०/१९ रोजी अटक केलेली होती.त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला होता.


त्यावर सरकार पक्षातर्फे आक्षेप घेण्यात आलेला होता.परंतु आरोपींचे वतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून पंढरपूर येथील सत्र न्यायाधीश श्री बाविस्कर साहेब त्यांनी डॉक्टर श्रीकांत मर्दा यांची रक्कम रुपये एक लाख रुपये तर प्रकाश गोडसे व अमोल काशीद यांची रक्कम रुपये पन्नास हजारांचे जामिनावर सुटका करणेबाबत आदेश केलेला आहे.

या कामी आरोपींचे वतिने अॅड श्री धनंजय हजारे,अॅड भारत बहिरट,अॅड सुनील खुळे यांनी काम पाहिले .सरकार पक्षाचे वतीने  अॅड  सारंग वांगीकर यांनी काम पाहिले .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा