मंगळवेढ्यातील बसस्थानकामधून महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी पळवले - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

मंगळवेढ्यातील बसस्थानकामधून महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी पळवले



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा बसस्थानकामधून एका विवाहितेच्या गळयातील १८ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण चोरून गेल्याची घटना घडली आहे.


या घटनेची हकिकत अशी ,कुंभार गल्लीमधील कविता शिवदास गोरे या आपल्या पतीसह मंगळवेढा ते सोलापूर बसने सोलापूरकडे जाणेकरीता मंगळवेढा बसस्थानकामध्ये बस क्र . एम एच १४ बी . टी . २८६४ मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने ३६ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण बसमध्ये चढत असताना चोरटयाने चोरून नेले .

अशा आशयाची फिर्याद कविता गोरे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलिस नाईक खिलारे करीत आहेत .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा