मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग ४ ब च्या अपक्ष उमेदवार डॉ.प्रज्ञा भूमिकांत सोनवले यांना जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
डॉ.प्रज्ञा सोनवले या प्रत्येक घरात जाऊन तेथील नागरिकांच्या व महिलांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत.निवडून आल्यानंतर या अडचणी कशा पद्धतीने सोडविल्या जाणार आहेत याची माहिती सर्व मतदारांना देत आहेत.
आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे आपला परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी त्या विकासाचा ध्यास घेऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांना परीसरातील जनतेतून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
एक उच्छशिक्षित डॉक्टर महिला डॉक्टरकीचा व्यवसाय न करता केवळ आपला परिसर स्वच्छ व सुंदर करता यावा यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा