मंगळवेढयात आज डॉ. प्रियंका रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

मंगळवेढयात आज डॉ. प्रियंका रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेमुळे देश सुन्न झाला. देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मराठी कलाकारांनीही या घृणास्पद घटनेवरुन संतापाला वाट मोकळी करून दिली. डॉ. प्रियांका यांनी पशुवैद्यकीय शाखेची पदवी घेतली होती. त्यांना ठाऊकच नव्हतं, की सगळ्यात भयानक पशू म्हणजे माणूसच आपल्याला असं संपवेल! या नीच आणि क्रूर पशूंना लवकरात लवकर भरचौकात जिवंत जाळलं पाहिजे. अत्यंत अविश्वासनीय...वेदनादायी!

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



बलात्काराचे खटले फास्ट ट्रॅकवर घेऊन या. अशा जनावरांना ताबडतोब कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, यासाठी एखादा कायदा किंवा तरतूद नाही का करता येणार? करायलाच हवं! लहान घटना असो किंवा ही अशी क्रूर असो, दरवेळेस हे असं वाचलं की मला पुरुष असल्याची लाज वाटते...वाटत राहते. शिक्षेच्या पलीकडे ही मनोवृत्ती नाहीशी व्हावी यासाठीही काही उपाययोजना करायला हव्यात. काय आणि कसं मला माहीत नाही, पण काहीतरी करायलाच हवं! अस मत सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी यांनी व्यक्त केले.

 डॉ. प्रियंका रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी नागरिकांनी दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी  ६ वाजता  शिवाजी तालीम कट्टा, शनिवार पेठ, मंगळवेढा येथे उपस्थित राहावे.देशसेवा, पि.पी.एन व गोरीशंकर बुरकुल मित्र परिवार यांनी आयोजित केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा