मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग ४ ब च्या जागेवर लागलेल्या निवडणुकीत डॉ.प्रज्ञा सोनवले यांनी काढलेल्या प्रचारार्थ रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कारखाना रोड,फिल्टर टाकी समोर,आवताडे वस्ती,तुकाई नगर,दामाजी कॉलेज परिसरात ही रॅली काढण्यात आली होती.
या भागात गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांना निवडून दिले त्यांनी कोणतेही ठोस असे काम केले नाही.त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.
आपल्या मूलभूत सुविधा पासून ते वंचित आहेत त्यामुळे यावेळी उच्छशिक्षित उमेदवाराला संधी देण्यासाठी नागरिकांनी चंग बांधला आहे. आज काढलेल्या रॅलीस नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्यामुळे आपला विजय निच्छित असल्याचा दावा डॉ.प्रज्ञा सोनवले यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा