मंगळवेढ्यात अपहरण करून जबरदस्तीने खरेदीखत केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

मंगळवेढ्यात अपहरण करून जबरदस्तीने खरेदीखत केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अपहरण करून जबरदस्तीने जमीन खरेदी केल्यावरून मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
      


याबाबत सविस्तर हकीकत अशी की,सलगर बुद्रुक येथील फिर्यादी महादेव आप्पासाहेब बिराजदार (वय.39)  हा आपल्या घराच्या पत्र्यासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी हुलजंती येथील कणशेट्टी यांच्या दुकानात जात असताना आसबेवाडी येथील औदुंबर मोरे यांच्या घराजवळ आरोपी सिध्दाप्पा बाबुराव बिराजदार रा.सलगर बुद्रुक व प्रदीप बिराजदार रा.कर्नाटक व इतर सात जणांनी चार चाकी वाहन mh10-8234 या वाहनातून पाठीमागून येऊन फिर्यादीस पाईपने मारहाण करत जखमी करून त्याच चार चाकी वाहनातून मंद्रुप,तेरा मैल, कर्नाटक व जुळे-सोलापूर या ठिकाणीच्या लाॅज मध्ये डांबून ठेवले. 


सलगर बु येथील जमीन गट क्रमांक 422 मधील 2 हेक्टर 81 हेक्टर इतकी जमीन आरोपी सिध्दाप्पा बिराजदार यांनी आपल्या अल्पवयीन मुलगा आकाश वय 16  नावे जबरदस्तीने खरेदी खत करून घेण्यात आल्याची फिर्याद दाखल करण्यात आली या घटनेचा अधिक तपास सपोनि बामणे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा