शंभू शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान प्रथमच मंगळवेढ्याला - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

शंभू शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान प्रथमच मंगळवेढ्याला




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

श्री शंभू शिवछत्रपतींच्या राजगडावर १६ जानेवारी रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याच निमंत्रण मंगळवेढ्याला प्रथमच मिळाल आहे. 


प्रथमच वारकरी संप्रदायातील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे व  दामाजी संस्थानास निमंत्रणाचा मान मिळाल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
    


तसेच वारकरी संप्रदायातील राज्याभिषेक सोहळ्याचे मानकरी होण्याचा मान प्रा.सदानंद मोरे (श्री तुकाराम महाराज वंशज), शितोळे सरकार अंकलीकर (वारी सोहळा मानकरी),ॲड.विकास ढगे पाटील,अभय टिळक (श्री क्षेत्र आळंदी), माणिक महाराज मोरे (श्री क्षेत्र देहू देवस्थान), राजाभाऊ चोपदार(वारी सोहळा मानकरी),केशव महाराज नामदास ,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर (पंढरपूर), गहिनीनाथ महाराज औसेकर (पंढरपूर देवस्थान समिती सहअध्यक्ष व मानाचे दिंडीकरी), कृष्णाजी विठ्ठल रांजणे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ),रामा महाराज वासकर (मानाची दिंडी), जालिंदर काळोखे (तुकाराम महाराज पालखी मानकरी), कल्पना निगडे (श्री क्षेत्र पंढरपूर देवस्थान) यांना मिळाला आहे.
    
बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी रायगड समितीचे निमंत्रण श्री संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांना श्री संत दामाजी मंदिरात देण्यात आली त्यावेळी  शिवाजीराव वाकडे ,सतिश पाटील, भिमराव पाटील ,ज्ञानेश्वर भगरे, पुंडलिक साठे आनंदराव जावळे, दत्तात्रय नागणे,स्वपनिल फुगारे आदि मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला. ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते. थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला. परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली. मात्र शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. 
   
छत्रपती संभाजीराजांच्या राज्यातील संघटना,प्रजेला राजनिष्ठ आणि स्वामिनिष्ठ ठेवण्यात दाखवलेली तत्परता,सैन्याची तयारी व शिस्त,तशीच सैनिकांची निर्भयता व चपळाई,ऐन दुष्काळातही सैन्यासाठी ठेवलेल्या सामग्रीची विपुलता वगैरे गोष्टी हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देत . 

सतत तीन-चार वर्षे मोगलांवर छापे घालून आपल्या साहसाने औरंगजेबाचा पाणउतारा करून शत्रूंत केलेलीअनिश्चितता व भीती,आपल्या सैन्याचे नुकसान होऊ न देता गनिमी काव्याने मोगली हल्यांचा केलेला प्रतिकार हे सर्व विक्रम दक्षिणेतील लोकांच्या मनातून मोगली सामर्थ्याची भीती दूर करत होते. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड १६ जानेवारी २०२० यायलाच लागतंय अस निमंत्रणात उल्लेख केलेला आहे..
   
तरी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी व वारकरी मंडळी या सोहळ्याला रायगड येथे उपस्थित राहणार आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा