मंगळवेढयाहून मल्लेवाडीकडे निघालेली मोटर सायकल सिमेट रस्त्यावर घसरून मोटर सायकलस्वार नितिन अभंगा गडहिरे ( वय ३६ रा . वाणी चिंचाळे ता . सांगोला ) हे रोडवर पडल्याने डोकीस मार लागून गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाले .
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
ही घटना सोमवारी सायंकाळी ७ . ०० वा . घडली असून या अपघाताची पोलिसांत नोंद झाली आहे .
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती , यातील खबर देणारे गोविंद तोडरमल्ली रा.मल्लेवाडी व मयत नितीन अभंगा गडहिरे हे दोघे दि.१३ रोजी सायंकाळी ७ वा . एम एच १३ सी ए ५८३३ वरून या डिलक्स या मोटर सायकलवरून मंगळवेढयाकडून मल्लेवाडीकडे जात असताना महादेव मंदिराजवळ असलेल्या गोळीपेंड कारखान्यासमोर आले असता मोटर सायकल घसरून सिमेंट रोडवर पडल्याने खबर देणाऱ्याचे मेव्हणे नितीन गडहिरे याच्या डोक्यास पाठीमागील बाजूस मार लागल्याने ते जागेवर मयत झाले .
याची पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा