मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सालाबादप्रमाणे सलग सहाव्या वर्षी गुरूवार दि.16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता रायगड येथे महाराष्ट्रातील मानाचे वारकरी यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
वारी सोहळयातील मानकरी शितोळे सरकार अंकलीकर, श्री क्षेत्र आळंदी येथील अॅड.विकास ढगे-पाटील, क्षेत्र देहू संस्थानचे माणिक मोरे महाराज, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर जळगावकर महाराज, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.कृष्णाजी विठ्ठल रांजणे, रांजणगाव संस्थान अध्यक्ष विजयराज दरेकर, महादजीराजे शितोळे अंकलीकर सरकार, देहू संस्थान विश्वस्त आबाजी टिळक, तुकाराम महाराज पालखीचे मानकरी जालिंदर काळोखे, अखिल भारतीय वारकरी मंडळ मंगळवेढा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांच्या हस्ते श्री शंभूछत्रपती महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
रायगड येथील बाजार तळापासून श्री शंभूछत्रपती महाराज यांची पालखीतून मिरवणुकीची सुरूवात झाली. शिरकाई देवी येथे मानाचा मुजरा तेथून होळीचा माळ तसेच राजसदरेवरून मिरवणुक संपन्न झाली. या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.सुजित कदम हेही आवर्जून उपस्थित होते. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळयाचे आयोजन शिवशंभूपाईक संघटनेने केले होते.
दरम्यान, शिरकाई मंदिर येथे मंगळवेढा येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सदस्यांचे रायगडावर भजन व भारूड संपन्न झाले. या कार्यक्रमात ह.भ.प.भारूडकर पांडुरंग गवळी यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गावून नंतर श्री संत एकनाथ महाराज यांच्या भारूडातून गडावर आलेल्या लहान तरूणांना व्यसनमुक्ती, भ्रूणहत्या, गोहत्या रोखणे, स्वच्छतेचे महत्व, पालकांनी मुलांना व मुलींना करावयाचे मार्गदर्शन आदि विषय भारूडातून शिवभक्तांसमोर मांडले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर भगरे, तालुका उपाध्यक्ष भिमराव पाटील, श्री संत दामाजी संस्थेचे चिटणीस सतिश पाटील, ह.भ.प.मारूती भगत, ह.भ.प. महादेव यादव, ह.भ.प. पुंडलिक साठे, ह.भ.प.सुभाष शिवशरण, ह.भ.प.अशोक गेजगे यांच्यासह भारत ढोणे, अरविंद माने, प्रकाश पवार आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा