मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि ७ जानेवारी पासून तूर हमीभाव खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात होणार आहे.या केंद्रामुळे सर्व स्तरावरील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या प्रक्रियेत नाव नोंदणी साठी संबंधित शेतकर्याचा ७/१२ उतारा,मूळ पिकपेरा दाखला,मूळ आधारकार्ड,मूळ बँक खाते पुस्तक आणि या सर्वांच्या सत्यप्रती (झेरॉक्स) सोबत आणावयाच्या आहेत.आणलेल्या सर्व सत्यप्रती वरील मजकूर स्पष्ट दिसावा.त्यासह खरेदी विक्री संघ कार्यालयातील संबंधित कर्मचार्याशी संपर्क करून मोबाइल नंबरसह नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्या नंतर त्या विभागा कडून एसएमएस प्राप्त झाल्या नंतर शेतकर्यांनी तूर विक्री साठी हमीभाव केंद्रावर आणायची आहे.त्या नंतर तुरीची रक्कम ऑनलाइन आपण दिलेल्या खात्यावर जमा होणार आहे.त्यासाठी आपण सुस्पष्ट अशा बँक पासबुक च्या प्रती द्याव्यात.सन २०१९-२० या साला साठी सुधारित आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५८००/- रु असा आहे.सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागद पत्रासह खरेदी विक्री संघ मंगळवेढा चे श्री नागणे ९४०५२१४५९५ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन मा श्री सिद्धेश्वर आवताडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा