मंगळवेढ्यात सैनिकाच्या पत्नीची अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

मंगळवेढ्यात सैनिकाच्या पत्नीची अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे २२ वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून बेडरूममधील सिलिंग पंख्याला कापडी स्टोलने गळफास घेवून आत्महत्या केली.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

ही घटना दि.५ रोजी दुपारी घडली असून रुक्मिणी शंकर सांगोलकर असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. 


या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पोलिस या मयताचा अधिक तपास करीत आहेत. खबर देणारे शंकर अरविंद सांगोलकर (वय २८) हे सैन्य दलामध्ये कारगिल येथे नोकरीस असून ३१ डिसेंबर रोजी ते कारगिल येथून रजेवर गावी आले आहेत . ३ जानेवारी रोजी रात्री ७ . ०० वा . पौट येथे त्यांनी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी खबर देणारे यांची बहिण यांच्याकडे नागणेवाडी येथे बांधलेल्या घरी आले. 

खबर देणारे यांची पत्नी मयत रुक्मिणी हि शुल्लक कारणावरून ती रागाला जात असल्याचे दिलेल्या खबरमध्ये नमूद केले आहे. तत्पुर्वी पतीला मुंबई येथे जावू असे म्हणाली होती. त्याप्रमाणे संध्याकाळी मुंबई येथे घेवून जाणार होतो . ५ रोजी खबर देणाऱ्याची बहिण व तीची मुले सकाळी ८ वा . सासरी रड्डे येथे गेली व खबर देणारे व त्यांची पत्नी यांनी मंगळवेढा येथे घरी मुक्काम केला . दि . ६ रोजी सकाळी ११ . ०० वा . जेवणखाण करून खबर देणारे स्टेट बँकेत गेले . तदनंतर होंडा शोरूमध्ये जावून दुपारी १ . ०० वा . परत घरी आले . त्यावेळी घरासमोरील मुख्य दरवाजा उघडा होता . 

लहान मुलगा हॉलमध्ये रडत बसला होता . यावेळी पत्नी रुक्मिणी दिसली नाही म्हणून बेडरूमच्या दरवाजाजवळ आलो असता दरवाजा आतून बंद असल्याने बेडच्या खिडकीतून खबर देणारे यांनी पाहिले असता पत्नी रुक्मिणी हिने सिलींग पंख्याला कापडी स्टोलने गळफास घेतलेला दिसला . 

दरवाजा मोडून पत्नी रुक्मिणी हिला पाहिले असता तोंडातून लाळ आलेली दिसली . रुक्मिणी हिला ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे घेवून गेलो असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा