मंगळवेढा : समाधान फुगारे
चारित्र्याचा संशय घेवून वेळोवेळी तीला घराच्या बाहेर काढून शारिरिक व मानसिक त्रास देवून अपमानित करून विवाहिता रुक्मिणी शंकर सांगोलकर (वय २२ रा.पौट ता.मंगळवेढा) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सैनिक तथा नवरा शंकर अरविंद सांगोलकर,सासरे अरविंद सांगोलकर,सासू लक्ष्मी सांगोलकर (सर्व रा.पौट) व नणंद पूजा हरी नवत्रे,नंदवा हरी ज्ञानोबा नवत्रे (रा. रड्डे हल्ली नागणेवाडी) सहाजणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या घटनेची हकिकत अशी की ,यातील फिर्यादी लक्ष्मी महादेव करांडे (रा.कोळा ता.सांगोला) यांची मयत मुलगी रुक्मिणी ही आहे.
रुक्मिणी हिने दि.६ रोजी दुपारी नागणेवाडी येथील रहात्या घरी बेडरूममधील सिलिंग पंख्याला कापडी स्टोनने गळफास घेवून आत्महत्या केली होती. पतीसह अन्य चार आरोपींनी दि १६ मे २०१७ ते ६ जानेवरी २०२० पर्यंत नागणेवाडी येथील रहात्या घरी मयत रुक्मिणी हिच्यावर चारित्र्याचा संशय घेवून वेळोवेळी तीला घराबाहेर काढून शारिरिक व मानसिक त्रास देवून अपमानित केल्याने तीने अखेर कंटाळून आत्महत्या केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अगोदर पती शंकर सांगोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत दाखल केले होते.मंगळवारी सकाळी ८.३० वा. दोन टेंपोभरून पुरुष व महिला मंगळवेढा पोलिस ठाण्यात वरील पाच आरोपीवर गुन्हा दाखल करा असे म्हणत मंगळवेढा पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला .सायंकाळी ४ वाजेपर्यंत नातेवाईक न उठल्याने अखेर वरील पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा लागला.
मयताचे पती शंकर सांगोलकर रा.पौट हे सैन्यदलात कारगिल येथे नोकरीस असून ते ३१ डिसेंबर रोजी तेथून रजेवर गावी आले होते.दि . ३ जानेवारीच्या रात्री पौट येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी नागणेवाडी येथे नव्याने बांधलेल्या घरी आले होते.तदनंतर दुपारी मयत रुक्मिणीने गळफास घेवून आत्महत्या केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा