सोलापूर : विजयगंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

सोलापूर : विजयगंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ

सोलापूर, 16 जानेवारी, (हिं.स) - माळशिरस पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील जाधववाडी-भांबुर्डी येथील विजयगंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. तालुक्यातील सर्वात लांब समजला जाणारा ओढा म्हणजे भांब ते तिरवंडी २८ किलोमीटर लांब असून हा ओढा ८ गावांच्या हद्दीतुन जातो अनेक गावांच्या पाणीपुरवठा विहिरी यावर अवलंबुन आहेत. या कामाच्या पूर्णत्वा नंतर २७ हजार घ.मी. पाणी साठा उपलब्ध होणार असून पाझर पाण्यामुळे सहा हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. पहिल्या टप्प्यात भांब ते कण्हेर दुसरा इस्लामपूर, जाधववाडी, भांबुर्डी तर तिसरा मेडद, तिरवंडी अशी तीन टप्प्यात ही योजना पूर्ण होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा