कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून, तसेच तोंडावर ठोसे मारून अमानुषपणे खून केल्याची घटना करवीर तालुक्यातील वडणगे निगवे रस्त्यावर घडली. सारिका विठ्ठल महानुर व 21 राहणार वडणगे असे महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली विठ्ठल महानुर पसार झाला आहे.

कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. असे पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर आणि पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दांपत्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते खुनाचे नेमके कारण सायंकाळपर्यंत उघडकीला येईल असे सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा