धक्कादायक:पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास, मृतदेह पाहून सात वर्षीय चिमुरडीने फोडला टाहो - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

धक्कादायक:पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास, मृतदेह पाहून सात वर्षीय चिमुरडीने फोडला टाहो


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. निलेश देशमुख आणि प्रियंका देशमुख यांचा प्रेमविवाह झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रियंका आणि निलेश यांना सात वर्षांची मुलगी आहे. दोघांचे मृतदेह पाहताच चिमुरडीने आईच्या नावाने टाहो फोडला. आत्महत्या करण्यापुर्वी निलेशने चिठ्ठी लिहिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रियंका आणि निलेश यांचा प्रेमविवाह झालेला होता. निलेश हा इंदूर येथील असून प्रियंका अमरावतीची आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते. सोमवारी सात वर्षीय मुलीला प्रियंकाने आपल्या मैत्रिणीकडे पाठवले.

रात्री नऊच्या सुमारास मुलीला घेऊन जाण्यासाठी मैत्रिणीने प्रियंकाला फोन केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मैत्रिणीने मुलीला घरीच ठेवून घेतले.
सकाळी पुन्हा एकदा मैत्रिणीने प्रियंकाला फोन केला. परंतु, तरीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, मैत्रीण प्रियंकाच्या भोसरी येथील घरी पोहोचली. दरवाजा ठोठावला असता कोणताही प्रतिसाद येत मिळाला नाही. आतून दरवाजा बंद होता. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले, दरवाजा तोडला असता आत प्रियंका मृतावस्थेत पडलेली होती तर गळफास घेऊन निलेशने आत्महत्या केली होती. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा