आकरावीच्या विद्यार्थीनीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

आकरावीच्या विद्यार्थीनीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अभ्यासाच्या ताणतणावातून अकरावी शास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ शहरातील अण्णाभाऊ साठे परिसरात घडली. स्वरांजली गणपत जाधव असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरांजली जाधव (वय १६) ही विद्यार्थिनी मोहोळ येथील एका महाविद्यालयात अकरावी शास्त्रमध्ये शिकत होती. ती सकाळी ७ वाजता घरातून शाळेला गेली होती. घरांमधील आई- वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कोणीही नसताना राहत्या घरी घूस मारण्यासाठी आणून ठेवलेले विषारी औषध प्राशन करुन स्वरांजली हीने आत्महत्या केली.

त्यानंतर तिची बहीण शाळेतून घरी आल्यानंतर तिने स्वरांजलीला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तिला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच मृ्त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सर्जेराव जाधव यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा