नागरिकत्व दुरुस्ती कायदयाच्या समर्थनार्थ मंगळवेढयात आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. तिरंगा रॅली निघणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
सदरची रॅली दामाजी चौकातून चोखामेळा चौक, मुरलीधर चौक या मार्गावरून निघणार असून प्रांत कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
बांगलादेश,अफगाणिस्तान,पाकिस्तान या ठिकाणच्या सर्व हिंद शीख, इसाई,बौध्द व जैन त्या ठिकाणच्या अल्पसंख्यांकाना धार्मिक छळामुळे देश सोडावा लागला. व ते गेली कित्येक वर्षे भारतामध्ये रहात आहेत. त्यांना नागरिकत्व मिळण्याच्या या कायदयास समर्थन देण्यासाठी सर्व देशबांधवांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा