युवा उद्योजक सागर दोशीचा अपघातात मृत्यू, पंढरपुरात हळहळ - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

युवा उद्योजक सागर दोशीचा अपघातात मृत्यू, पंढरपुरात हळहळ


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:

पंढरपूर येथील युवा उद्योजक सागर राजेंद्र दोशी (वय 31) यांचे अपघाती निधन झाले. फॉर्च्युनर गाडीचा पुढचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघात अन्य दोनजण जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. सागर आणि त्यांचे दोन मित्र सोलापूर रोडने पंढरपूरकडे येत असताना तीन रस्ता चौकात हा अपघात झाला

गाडीचा पुढचा टायर अचानकपणे फुटल्याने सागर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी कोलमडत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.

या अपघातात सागर, त्यांचे मित्र बाळू धोत्रे आणि सोमनाथ टरले जखमी झाले. यात सागर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सागरच्या अकाली निधनाने पंढरपुरात शोक व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा