स्थिती गंभीर! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सतरावा बळी; आणखी 31 पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

स्थिती गंभीर! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सतरावा बळी; आणखी 31 पॉझिटिव्ह




टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनामुळे बळींचा आकडाही वाढत आहे.तालुक्यातील सलगर बु येथील एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे तर आज आणखी 31 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.


आज दि.12 सप्टेंबर रोजी 6 नागरीकांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आज 431 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.







वरील 431 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह  31 निगेटिव्ह 400 आलेले आहेत.


सदर नागरीक हे मंगळवेढा 17 , चोखामेळानगर 1 , दामाजीनगर 6 , डोंगरगांव 2 , हाजापुर 2 , खवे 1 , तळसंगी 2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.


सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे आज एकाही नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला नाही.

मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 858 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 380 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 461 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

  
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा