कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सांगोल्यात जनता लॉकडाउन; आज 45 रुग्णांची वाढ - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सांगोल्यात जनता लॉकडाउन; आज 45 रुग्णांची वाढ




बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने दहशत माजवली असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.कोरोना रुग्णांची साखली तोडण्यासाठी सांगोला शहरात 10 दिवसाचा जनता लॉकडाउन पाळण्यात येणार आहे.


आज आणखी 45 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 76 वर गेली आहे.


आज दि.12 सप्टेंबर रोजी नागरीकांचे स्वँब (RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 401 रँपीड अन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.


वरील 401 रपीड अन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 44 आणि निगेटिव्ह 357 आलेले आहेत. सदर नागरिक हे सांगोला शहर 20, अकोला 2, किडबिसेरी 1, पारे 1, महीम 2, महुद 1, उदनवाडी 2, सोनंद 1, संगेवाडी 5, गोडसेवाडी 2, कमलापुर 6, डिकसळ 1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुगणाचे संपर्कतील आहेत.


सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वँब (RT-PCR) चे आज 1 नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सदर नागरिक हे नाइरे 1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णांचे संपर्कतिल आहेत.


सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 76 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 462 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 602 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

  
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा