टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येचा नवा उच्चांक निर्माण होत आहे. आज आतापर्यंत सर्वाधिक 663 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 16 हजार 768 वर पोहचली आहे.
आज 4 हजार 68 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 405 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 663 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत 16 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 481 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
अद्यापही 5 हजार 454 जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरे गेलेल्यांची संख्या 10 हजार 103 इतकी झाली आहे.
आज 'या' भागात 13 कोरोना बळी
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील 55 वर्षाची महिला, वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 55 वर्षाचे पुरुष, श्रीपूर (ता. माळशिरस) येथील 45 वर्षाची महिला, उमदे गल्ली पंढरपूर येथील 73 वर्षाचे पुरुष, अरण (ता.माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष,
माळखांबी (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील 65 वर्षाचे पुरुष, माळीनगर (ता. माळशिरस) येथील 41 वर्षाचे पुरुष, महूद नाका चिंचोली रोड सांगोला येथील 58 वर्षाचे पुरुष,
पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील 70 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 58 वर्षाचे पुरुष, बबलाद (ता. अक्कलकोट) येथील 47 वर्षाचे पुरुष, मंगळवार पेठ बार्शी येथील 63 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा