शेतकऱ्यांना मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा; 12 लाखांची कालबाह्य कीटकनाशके जप्त - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

शेतकऱ्यांना मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा; 12 लाखांची कालबाह्य कीटकनाशके जप्त

 



टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर तालुक्यातील कासेगाव कृषी केंद्र मध्ये मुदतबाह्य कीटकनाशकांचे विक्री करणाऱ्या विरूध्द कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या कारवाई करण्यात आली.


या कारवाईमध्ये १० ते १२ लाख रुपयांची ८८ प्रकारची कालबाह्य कीटकनाशके केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर.वाय.पवार यांनी दिली.


कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेतीसाठी लागणारे औषधे विक्री करणाऱ्या दुकानाची नियमित असणारी तपासणी सुरू केली होती.








तपासणीदरम्यान कासेगाव येथील फिरोज यासीन यासुफसाहेब शेख यांच्या कृषी मित्र अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रा मध्ये तपासणी केली.


यावेळी १० ते १२ लाख रुपयाचे कालबाह्य कीटकनाशके मिळून आले. हा सर्व मला कृषी विभागाने ताब्यात घेतला आहे.


यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र चंद्रहास माने, जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक सागर भारवाकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, पंचायत समिती अधिकारी विजय मोरे, कृषी पर्यवेक्षक शशिकांत महामुनी, कृषी सहाय्यक सुनील प्रक्षाळे यांनी केली आहे.


याबाबत फिरोज यासीन यासुफसाहेब शेख यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.






Pandharpur kasegav 12 lakh expired pesticides seized, action taken by agriculture department

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा