टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे मृत्यू तांडव सुरूच असून आज पुन्हा 14 जणांचा बळी गेला आहे.तर 415 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
आज एकूण 3 हजार 162 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 747 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 415 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर आज 234 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत ग्रामीण भागातील 415 नव्या रुग्णांची भर पडली असून सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 18 हजार 748 झाली आहे. ग्रामीण भागातील 531 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
रुग्णालयात सध्या 6 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू असून 11 हजार 838 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 234 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 103 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
आज 'या' गावातील 14 जणांचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथील 70 वर्षिय महिला,करमाळा तालुक्यातील केम येथील 76 वर्षीय महिला. पंढरपुरातील रोहिदास चौकातील 35 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील 58 वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील संत पेठ मधील 69 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड येथील 70 वर्षिय पुरुष,
तर बार्शीतील शिवाजीनगर येथील 77 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील देवडे येथील 60 वर्षीय महिला, बार्शी तालुक्यातील जामगाव येथील 55 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील 55 वर्षीय महिला, सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील 50 वर्षीय महिला,
माढ्यातील राजरतननगर येथील 55 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील 55 वर्षिय पुरुष अशा 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात आज 46 रुग्णांची भर
सोलापूर शहरात आज नव्याने 46 रुग्णांची भर पडली असून आता कोरोना बाधितांची संख्या सात हजार 644 वर पोहचली आहे. त्यामध्ये चार हजार 481 पुरुषांचा तर, तीन हजार 161 महिलांचा समावेश आहे.
शहरातील 301 पुरुष आणि 147 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा