टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रीय महामार्ग प्रकरणी काझी यांच्या सहा याचिका उच्च न्यायालयाने काढून टाकल्या असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सोमवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वा. प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार असून या सुनावणीस बाधित शेतकऱ्यांनी हजर रहावे असे आवाहन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार यांनी केले आहे.
नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र .१६६ बाबत मुंबई उच्च न्यायलयाने काझी यांच्या सहा याचिका काढून सुनावणी टाकलेल्या आहेत.
उपविभागीय अधिकारी यांचेकडील काझी यांच्या मंगळवेढा,आंधळगांव, गणेशवाडी , कचरेवाडी , ब्रम्हपुरी व माचणूर या गावच्या अर्जाबाबत उच्च न्यायालयाचे आदेशानुसार २१ डिसेंबर ही तारीख नेमलेली आहे.
या दिवशी प्रांताधिकाऱ्यांसमोर सर्व काझी व महामार्गबाधित शेतकऱ्यांच्यावतीने म्हणणे / निवेदन दाखल करावयाचे आहे.
सदर सहा गावच्या महामार्गबाधित जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी ११.०० वा . प्रांत कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे आवाहन अॅड.नंदकुमार पवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा