टीम मंगळवेढा टाईम्स । फोन पे ऑपरेट करा, असे सांगून अनोळखी व्यक्तींनी बॅंक खात्यातून 79 हजार 28 रुपये काढून घेऊन फसवणूक केली.
याबाबत संजय शिवाजी भोसले (वय 46, रा. निखिल थोबडे नगर, वसंत विहार, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय भोसले यांनी त्यांच्या ओळखीच्या एका दुकानातून स्टार्टर पेटी व केबल असे साहित्य खरेदी केले होते व त्याचे पैसे ऑनलाईन फोन पे केले. हे पैसे मिळाले नाहीत, म्हणून दुकानदाराचा फोन आल्यानंतर भोसले यांनी फोन पे कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर समोरून फोन आल्यावर तक्रार केली.
त्यावेळी फोन पे ऍप ऑपरेट करा, असे सांगितल्यावर त्यांनी फोन पे ऑपरेट केले असता त्यांच्या खात्यातून 79 हजार 28 रुपये कट झाले.
अशाप्रकारे त्यांची फसवणूक करण्यात आल्याची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सहायक फौजदार सय्यद तपास करीत आहेत.
15 लाखांसाठी विवाहितेचा छळ
घर घेण्यासाठी 15 लाख रुपये माहेरून आणावेत, म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह पाचजणांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सपना महेश कटकधोंड (वय 28, रा. पन्हाळा अपार्टमेंट, किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ, आसरा चौक, सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरुन पती महेश कटकधोंड, सासरे शिवशरण कटकधोंड, सासू प्रभावती कटकधोंड, दीर दिनेश कटकधोंड, नणंद जयश्री कटकधोंड (सर्व रा. हितेश अपार्टमेंट, सनग्रेस स्कूलजवळ, हिमालय सोसायटी, घाटकोपर, मुंबई) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नामध्ये अपेक्षेप्रमाणे वस्तू दिल्या नाहीत. तसेच घरासाठी 15 लाख रुपये सपनाने आणावेत, म्हणून तिचा छळ केला, अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. हवालदार घुगे तपास करीत आहेत.
वाहतूक शाखेकडून 151 वाहनधारकांवर कारवाई
सोलापूर शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील विजापूर रोड व पुणे महामार्गावर इंटरसेप्टर वाहनातील कॅमेऱ्याद्वारे भरधाव जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पुणे महामार्गावर 131 कार आणि दुचाकी तसेच विजापूर रोडवरील अत्तार नगर येथे 20 वाहनांवर ओव्हरस्पीड, हेल्मेट नसणे अशा कलमांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी कारवाई दररोज करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त दीपाली धाटे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा