काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्‍यात दहा दिवसांत 733 रुग्णांची वाढ अन्‌ 19 जणांचा बळी - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्‍यात दहा दिवसांत 733 रुग्णांची वाढ अन्‌ 19 जणांचा बळी



टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्‍यात पोटनिवडणुकीनंतर रुग्ण वाढू लागले आहेत. परंतु, चिंतेची बाब म्हणजे मागील दहा दिवसांत पंढरपूर तालुक्‍यात अडीच हजार रुग्ण वाढले असून त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मंगळवेढ्यात 5 ते 14 एप्रिल या काळात 733 रुग्ण वाढले असून त्यातील 19 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


बुधवारी पंढरपूर तालुक्‍यात 212 रुग्ण तर मंगळवेढ्यात 34 रुग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


बुधवारी शहरात 338 रुग्ण वाढले असून तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये एक हजार 111 रुग्ण आढळले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनामुळे बुधवारी आडवा रस्ता (बार्शी) येथील 32 वर्षीय तरुणाचा, सिद्धापूर (मंगळवेढा), पंत नगर, कवठे गल्ली (पंढरपूर), बासलेगाव (अक्कलकोट), कुंभार खानी (मोहोळ), विद्या नगर (शेळगी), श्रीनगर (जुळे सोलापूर), जयकुमार नगर (विजयपूर रोड), सोनी नगर (मोदी खाना) येथील मृत रुग्णांचे वय 48 पेक्षाही कमीच होते.


तर बरेच रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी विलंबाने दाखल झाल्याचेही रिपोर्टवरून स्पष्ट होते.


मोहोळ तालुक्‍यात 64 रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर करमाळ्यात 125, उत्तर सोलापुरात 68, सांगोल्यात 59, दक्षिण सोलापुरात 18 रुग्ण वाढले आहेत. तसेच बार्शीत 126 रुग्ण वाढले असून दोघांचा तर माळशिरसमध्ये 232 रुग्ण वाढले असून त्या ठिकाणीही दोघांचा मृत्यू झाला आहे.


माढ्यात 155, अक्कलकोट तालुक्‍यात 18 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या 84 हजारांच्या उंबरठ्यावर पोचली असून मृतांची वाटचाल अडीच हजारांकडे सुरू आहे.








राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल 'मंगळवेढा टाईम्स'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा