टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सर्वांत मोठी आहे. जिल्ह्यात नगर पंचायत व नगरपालिका आहेत. त्यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा वगळता आरोग्य सेवा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आरोग्याचा मोठा ताण आहे. याही परिस्थितीत शहराकडे ग्रामीणमधून येणाऱ्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी सध्याची अवस्था आहे.
गरीब रुग्णांचे हाल होऊ नयेत व मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने वेळेत उपचार व्हावेत या उद्देशाने गाव तेथे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सीईओ दिलिप स्वामी यांना भाग्यश्री वठारे , अनुप देशमुख आणि टीम मार्फत विनंती करण्यात आली त्याला सीईओ स्वामी सरांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तशा सूचना दिल्या .
मेडशिंगी, ता. सांगोला, जिल्हा- सोलापूर येथे..
3 वर्षापासुन हॉस्पिटलसाठी इमारत बांधून तयार आहे पण हॉस्पिटल अजून सुरू नाही झाले. मागच्या वर्षी ही इमारत 6-7 बेड आणून Isolation वॉर्ड साठी वापरली होती, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस येत होते तिथे.
पण सध्या कोरोनाचे इतके पेशंट असताना सुद्धा ते हॉस्पिटल बंद आहे. सध्या मेडशिंगी गावात 35 covid चे पेशंट आहेत. त्यामुळे आमच्या सोलापूर ZP चे CEO दिलीप स्वामी सरांना याबद्दल माहिती दिली व लवकरात लवकर हॉस्पिटल सुरू करण्यास सांगितले...लवकरच हे हॉस्पिटल सुरू होईल व लोकांची सोय होईल असे सरांनी सांगितले.
व तात्काळ सरांनी प्रतिसाद देत परिपत्रक काढले व सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुचना दिल्या..व सर्व तालुक्याच्या ठिकाणी व गावच्या ठिकाणी शक्य होईल तेवढे Covid सेंटर उभारण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी असे भाग्यश्री वठारे यांनी सकाळ शी बोलताना सांगितले .
राज्यातील कोरोना व्हायरसच्या साथीने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्या सह पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे खाटा व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून स्थिती अशीच राहिली तर मृत्यू संख्याही वाढण्याचा धोका आहे.दररोज महाराष्ट्रात शहरी तसेच ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे.
तसेच या गाव तिथे कोविड सेंटर या संकल्पनेसाठी प्रत्येक तालुक्यात तसेच गावात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक तयार करून , प्रशासनाची मदत घेऊन गावं तिथे covid सेंटर उभारण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार. प्रत्येक तालुक्यातील युवकांनी या उपक्रमासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावे. ही विनंती .
Corona helpline team कडून पुणे येथे Corona रुग्ण साठी war room suru करण्यात आली असून मागील १५ दिवसामध्ये यांच्याकडून रुग्णांना इंजेक्शन्स , ऑक्सिजन बेड , व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामुळे सर्व स्तरातून यांचे कौतुक होत आहे
Corona helpline team -
भाग्यश्री वठारे (सोलापूर), अनुप देशमुख (सोलापूर) , परम बिरादार (लातूर) , अजय आवटे (पुणे) ,सौरभ राऊत (पुणे) ,पैगंबर शेख (पुणे) , पूजा झोळे (पुणे) , शंभुराजे ढवळे (सोलापूर) ,राहुल कवठेकर (बीड) , डॉ .ऋषिकेश भवर (उस्मानाबाद) , मोसिन अत्तार, कृष्णा तवले (उस्मानाबाद)आणि इतर .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा