टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सोलापूर रोडवरील मंगळवेढा शिवारात भिमा ढाणे यास लिंबाच्या झाडाला बांधून त्याचा खून केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत भिमा सदा ढाणे (वय ५२ रा. नागणेवाडी, मंगळवेढा) हा दि .१९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० पासून राहते घरातून घरगुती कामाकरीता घराबाहेर गेला होता. तो परतला नाही म्हणून तो बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसात दाखल होती.
सदर व्यक्तीस बेपत्ता तारीख व वेळेपासून २१ एप्रिल रोजी दुपारी १.०० च्या पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने मंगळवेढा ते सोलापूर जाणाऱ्या रोडच्या उजव्या बाजूस असलेल्या कॅनॉललगत हरी बाबू घाटूळ यांच्या शेतातील
लिंबाच्या झाडाखाली निर्मनुष्य , निर्जन ठिकाणी नेवून अज्ञात कारणावरून त्याचेशी झटापट करून त्याच्या गळ्यात सुती रस्सीने गळफास लावून त्याच रस्सीने त्यास लिंबाच्या झाडास बांधून त्याचा खून केला अशी फिर्याद ओंकार विश्वास भोसले (रा.गोपाळपूर ता. पंढरपूर) यांनी मंगळवेढा पोलिसात दिली.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा