टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता ज्यांना किरकोळ स्वरूपाचा त्रास होतो.त्यांनी घरात अलगीकरण करून घ्यावे. फुफ्फुसाचा स्कोअर ८ ते १० असला तरी रुग्ण घरी राहून बरा होतो. त्यांना ऑक्सीजन व रेमडिसीवीरची गरज नाही.
घरात अलगीकरण होऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करून घेतल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० ते ९ ० टक्के आहे. अलगीकरण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती डॉ.वृषाली पाटील यांनी दिली.
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ६७७ पर्यंत पोहचली आहे. १ हजार १६८ जणांवर विविध हॉस्पिटल कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.
सध्या बेड शिल्लक नाहीत, नागरिकांना त्रास होत असल्यास त्यांनी घाबरून न जाता तपासणी करून घ्यावी. मात्र कोरोनाची प्राथमिक स्वरूपाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात धाव घेण्याची गरज नाही.
गृह अलगीकरण होऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. रुग्ण घरात असल्याने मानसिक स्थिती चांगली राहते. कोविड हा पहिल्यांदा रक्तावर आघात करतो. नंतर फुफ्फुसावर आघात करतो, यामुळे त्रास रुग्णांनी पहिल्यांदा रक्ताची तपासणी करून घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. गृह अलगीकरण झालेले ९० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
सध्या मी १२ ते १४ तास कोविड सेंटरमधील ड्युटी पाहत आहे. गृह अलगीकरणातील रुग्णांकडे लक्ष दिले जात आहे, असेही डॉ . पाटील यांनी सांगितले.
शहरातील रुग्णांवर गृह अलगीकरणात उपचार करण्यासाठी ४८ डॉक्टरांची टिम कार्यरत आहे टिमकडूनच शहरातील विविध भागात गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांच्या तब्येतीची दररोज सकाळ-संध्याकाळ तपासणी केली जात आहे.
अशा रुग्णांना मानसिक आधार हे डॉक्टर्स देत आहेत, त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून त्यांना कौटुंबिक सौख्य लाभत आहे , असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना डॉ.पाटील म्हणाल्या, सध्या उन्हाळा असल्याने रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे ज्यांना मधुमेहाचा त्रास नाही त्यांनी लिंबू सरबत घ्यावे,आहारात फळांचा वापर करावा. योगा अनुलोन विलोन, कपाल भारती करावी.
जास्त त्रास होत असल्यास तापाच्या गोळ्या व स्टिरॉईडचे डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिले जातात असे डॉ.वृषाली पाटील यांनी सांगितले.(स्रोत : पंढरी संचार)
तातडीने गृहअलगीकरण गरजेचे : डॉ.वृषाली पाटील
प्रत्येक कोरोना रुग्णाला तातडीने रेमडेसीवीर किंवा ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत नाही, जरा लक्षणे आढळली तरी तातडीने गृह अलगीकरणामध्ये राहून घरी भेट देणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याची गरज आहे. यामुळे आपण स्वतःला तातडीने सुरक्षा प्रदान करू शकतो आणि प्रशासनावरील ताण वाचवू शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा