टीम मंगळवेढा टाईम्स।
डॉ. अमर मारुती ढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे कडून पर्यावरणशास्त्र शाखेत नुकतीच पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
यापूर्वी डॉ. अमर ढेरे यांनी सामाजशात्र या विषयात पीएच. डी. संपादित केलेली आहे. त्यांच्या दुसऱ्या पीएच. डी. संशोधनाचा विषय हा 'ए स्टडी ऑफ भीमा रिव्हर वॉटर क्वॉलिटी फ्रॉम इट्स ओरिजीन टू उजनी रिसरवोईर' हा होता.
भीमा नदीच्या पाण्याची गुणवत्ता व उपयोग तपासनाचे महत्वपूर्ण निष्कर्ष त्यांच्या या संशोधनातून प्राप्त झालेले आहेत. भीमा नदीच्या उगमापासून ते उजनी धरणापर्यंत एकूण २० ठिकाणच्या पाण्याची गुणवत्ता शास्त्रपूर्ण अभ्यासातून तपासून याच्यावर योग्य ते उपयोजना डॉ.अमर ढेरे यांनी सांगितलेल्या आहेत.
त्यांनी हे संशोधन प्रवरानगर येथील पद्मश्री विखे-पाटील महाविद्यालयाचे पर्यावरणशास्त्रचे विभागप्रमुख व जल शाश्त्रन्य डॉ. गोरक्ष पोंदे व डॉ. ए. जे. ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
या पूर्वी डॉ. अमर ढेरे यांची राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर वीस पुस्तके प्रकशित झालेले असून, एकूण एकोणचाळीस शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेले आहेत.
यापूर्वी डॉ. ढेरे याचे आठ पेटंट भारतीय पेटंट अधिकार आयोग यांच्याकडून प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेउन त्यांना या पूर्वी चीन, कॅनडा या देशांमधून व्याख्यानासाठी निमंत्रित केलेले आहे.
हैद्राबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे भीमा नदीवर मानवी घडामोडीवर होत असलेल्या परिणामांचा भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे केलेला अभ्यासचे सादरीकरणासाठी आमंत्रित केले होते. डॉ.अमर ढेरे यांच्या दुसरी पीएच.डी. बद्दल त्यांचे दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी कृष्णदेव घुले, युवराज घुले व घुले परिवारा कडून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा