टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता दोन्ही ठिकाणी 200 बेडचे कोवीड सेंटर उभा करण्यात यावे अशी मागणी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या निमित्ताने मंगळवारी त्यांनी येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,
तालुका आरोग्य अधिकारी नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद शिंदे, यांच्यासह आरोग्य खात्यासह, विविध खात्याचे अधिकारी व उपस्थित होते.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही तालुक्यांमध्ये प्रचाराच्या निमित्ताने बाहेरील नेते व कार्यकर्ते येऊन गेले आहे त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी वाढू लागली. मंगळवेढ्यात सह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. अशा परिस्थितीत बहुतांश गावाने स्वतः लाॅकडाऊन जाहीर केले.
परंतु वाढती लोकसंख्या आणि प्रशासनाचे प्रशासनाने करावयाचे उपाय नाही यासंदर्भात बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आणखीन दोन ठिकाणी कोवीड सेंटर व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या व आरोग्य खात्याला आवश्यक ते औषधे व चाचण्या करण्याच्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर कँटोन्मेंट झोन जाहीर करण्यात आला परिसरातील नागरिकांच्या आरोग्य चाचण्या व आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य खात्याला देण्यात आल्याचे सांगून तालुक्यात प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
कोरोना रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे तरी इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देणेबाबतची मागणी करण्यात आली.
युटोपियन,दामाजी,जकाराया या साखर कारखान्याने ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले तालुक्याला ऑक्सीजन वर रेमडेसिव्हिरचा पुरवठा मागणीप्रमाणे झाला तर रुग्णांना सोयीचे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा