दाखल गुन्ह्यात कोणतीही कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी 10 हजाराची लाच मागून पहिला हप्ता 2 हजार रुपये स्वीकारताना पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
सर्जेराव शंकर पाटील, (वय ३८ वर्षे, व्यवसाय नोकरी, पोलीस नाईक बनं ११७४ नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे,सोलापूर) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे विरुध्द सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे परस्पर विरोधी तक्रारी अर्ज दाखल असुन
या अर्जानुसार तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करता सदर प्रकरणामध्ये सहकार्य करण्यासाठी पोलीस नाईक सर्जेराव पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे रुपये
१० हजारची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती रुपये ५ हजार स्विकारण्याचे मान्य करून त्यातील पहिला हप्ता म्हणुन रु २ हजार लाच रक्कम सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे स्विकारली.
त्यावेळी पोलीस नाईक पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर , पोलीस अंमलदार सपोफी कोळी, पोना घुगे, पोशि जानराव, पोशि सण्णके, पोशि मुल्ला चापोशि सुरवसे सर्व ने अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल 'मंगळवेढा टाईम्स'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा