टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात सध्या अवेळी होत असलेल्या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनीला लेखी किंवा ऑनलाईन तीन दिवसांत कळविणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात अवेळी पाऊस पडत आहे. ढगाळी हवामान व काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने द्राक्ष डाळिंब , कांदा व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला येत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२१ मध्ये अधिसूचित पिकांसाठी सहभाग नोंदविलेला आहे.
अशा शेतकऱ्यांनी पिकांचे काढणी पश्चात नुकसान होत असेल तरत्याबाबत पीक नुकसानीच्या पूर्वसूचना संबंधित पीक विमा कंपनीकडे देने बंधनकारक आहे.
ही तक्रार किंवा लेखी स्वरूपात 72 तासांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मंडळ, तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क करावा.
ज्या पिकांना कापणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. अशा पिकांची कापणी किंवा काढणीनंतर शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांच्या कापणीनंतर दोन आठवड्यांच्या आत ( १४ दिवस )
गारपीट, चक्रीवादळ , चक्रीवादळामुळे आलेला पाऊस किंवा बिगर मोसमी पावसामुळे नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येतात.
यात शासकीय निकषांच्या अधिन राहून काढणी पश्चात नुकसान म्हणून पीक नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा - 9970766262

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा