सोलापुरातल्या कॉंग्रेस भवनातील घटना; पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावले - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

सोलापुरातल्या कॉंग्रेस भवनातील घटना; पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावले



टीम मंगळवेढा टाईम्स ।

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पटोले यांच्या दौर्‍याचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून आले आहेत.


पटोले यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी कॉंग्रेस भवनात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बैठका सुरू आहेत. याच बैठकीतून माजी परिवहन सभापती केशव इंगळे हे रागाने उभे राहिले. 

तसेच शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावर निशाणा साधत प्रकाश वाले हे आपल्याला बैठकीला बोलावत नाहीत आणि बैठकीत आल्यानंतर बोलू देत नाहीत असा आरोप करत अंगावर गेले. अध्यक्षपद सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी इंगळे यांनी केली.  


तर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपल्याला काय बोलायचे ते बोला मात्र माझ्याकडे बोट करू नका असा सल्ला व्यासपीठावरून वाले यांनी दिला. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले, यावेळी उपस्थित नगरसेवकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.(स्रोत:tv9मराठी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा