टीम मंगळवेढा टाईम्स ।
31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कोटी-कोटी समाजबांधवांच्या दैवत असलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे अगदी जवळ येऊन ठेपली असून
कोरोनाचे संकट आपल्या देशावर आणि देशातील प्रत्येक कुटुंबावर असताना अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या दैवताची जयंती आज रोजी कोरोनाच्या संकटात असलेल्या मग ते आपले समाजबांधवच नाही तर संकटात सापडलेला जो कोणी व्यक्ती असेल त्यांच्या मदतीला जाऊन साजरी केली पाहिजे.
आपण गेली अनेक दिवस पाहत आहोत की देशातील प्रत्येक नागरिकावर काही ना काही प्रमाणात कोरोणाचे संकट कोसळले असून कित्येकाची कुटुंब यांमध्ये बरबाद झाले आहेत.
उद्योगधंदे बंद पडलेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतमजुरांच्या हाताला काम नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे,
कित्येकांचे नोकऱ्या गेल्या आहेत.आपला जीव कसा वाचेल याकडे प्रत्येकाचे लक्ष आहे. आजही कित्येकांच्या घरात अन्न नाही, उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे असताना आपल्याला आपले दैवत असणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरा करता येईल.
त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने आपापल्या घरी जयंती साजरी करावी. त्याचाच खर्च टाळून कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी,अस माझं मत आहे.
आज ज्याच्यावर हे संकट आल आहे हे उद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकतो. जात, पंथ, धर्म कुठलाही विचार न करता आपण संकटांना धावून गेले पाहिजे आणि हे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केली असून
त्यांना अभिप्रेत म्हणून आपण सुद्धा या वर्षी जयंती वर खर्च न करता कोरोना संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे आणि जयंती आपल्या घरीच साजरी केली पाहिजे असे आवाहन "वसुंधरा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य" या सामाजिक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पुजारी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा