कौतुकास्पद! कोरोना रुग्णांची मोफत सेवा करणारे डॉक्टर मोटे कुटुंबीय - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ४ मे, २०२१

कौतुकास्पद! कोरोना रुग्णांची मोफत सेवा करणारे डॉक्टर मोटे कुटुंबीय



देवानंद पासले । टीम मंगळवेढा टाईम्स


कोरोना माहामारीत अतिशय समाज उपयोगी कार्य करणाऱ्या आपल्या गावातील बहिण व भाऊ याच्यां कार्या विषयी मी आपल्याशी संवाद साधत आहे.


शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या अंभगांप्रमाणे नरखेड चे समाज सेवक डाॅ.कै.श्रीरंग(मामा)मोटे यानीं संपूर्ण नरखेड परिसराची सेवा केली त्याच्यां विचारावर्ती चालून बबन दादा यानीं माणसाचीं व सुरेश भाऊ मोटे यानी पशुवैधकिय सेवा संपूर्ण परिसराची केली पैस्या पैक्षा माणसानां केद्रंबिदू मानून त्यानीं सेवा केली. 


आज त्याचीं मुले कै श्रीरंग मामा ची नातंवडे मोटे कुटूबांची तिसरी पिढी सुरेश भाऊ मोटे याचीं मुलगी डाॅ.प्रियंका व डाॅ.प्रविण कोरोनाच्या कठीण काळात समाजाची सेवा करत आहेत.




डाॅ.प्रियंका मोटे यानी BHMS CGO CCH MD. व डाॅ. प्रविण मोटे यानी BSC-CHEM+पशुसंवर्धन व्यवस्थापन /अभ्यासक हे पदवि शिक्षण पूर्ण केले आहे 


कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी कोरोना काय आहे त्याच्या पासून वाचण्या साठी आपन काय सुरक्षा घेयची याची सामान्य माणसानां जास्त माहिती नव्हती यावेळी डाॅ.प्रियंका मोटे ह्या पुणे येथे दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल मध्ये कोविड सेटंर मध्ये कार्य करत होत्या तसेच त्यांचे सहकारी नरखेड चे सुपुत्र मा डाॅ.शुभम चौधरी BAMS नोबेल सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल अहमदनगर या ठिकाणी कार्य करत होते. 


यातुन गावासाठी वेळ काढून या तिन्ही मुलानीं संपुर्ण गावामध्ये घरोघरी फिरून विना मुल्य गावातील लोकांची कोविड टेस्ट घेतल्या व कोरोना पासून बचाव कसा करायचा याचे  मार्गदर्शन केले.


सध्या कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये 

डाॅ.प्रियंका व डाॅ.प्रविण हे कोरोनाच्या भयावह वातवरणामध्ये जानां कोरोना झाला आहे त्याच्यां घरी जाऊन त्या पेशंटची तपासणी करतात ,ज्यानां सिमटन्स आहेत त्याचें कोविड आहे कि नाही याचे निदान करतात,ज्या रूग्नानां ऑक्सीजन बेडची गरज आहे. 


त्यानां त्यांच्या स्वताचे वैदकिय क्षेत्रातील नेटवर्क वापरून बेड मिळवून देतात तसेच ज्याना ऑक्सीजन बेड मिळत नाही आश्याना घरच्या घरीच ऑक्सीजन टाकि भरून आणून जोडण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करतात ज्याचीं परस्थीती अर्थीक नाजुक आहे त्यानां महात्माफुले योजनेतून बेड मिळवून देतात डाॅ प्रियंका ह्या पेशंटचे सर्व रिपोर्ट बघून व तपासून त्याला कोणत्या ट्रीटमेन्टची गरज आहे.


हे समजाऊन सागंतात व कमीत कमी खर्चात सदर कोविड झालेला व्यक्ती ठीक कसा होईल यासाठी भरपूर पर्यत्न करतात कोविड सेटंर मध्ये संपूर्ण पिपी किट घालून लोक काम करतात परंतु नरखेड मध्ये आपन जो वापरतो तो साधा मास्क घालून प्रियंका व प्रविण स्वताच्या जीवाची पर्वा न करता पेशंटला तपासण्याचे व माणसिक आधार व धीर देण्याचे काम करतात या कामासाठी ते कोणाकडून ऐक रूपाया सुध्दा ते घेत नाहीत.


स्वताच्या कामाचा कधीही गाजावाजा करत नाहीत.काही ठिकाणी हाॅस्पिटल वाल्यांनी कोरोना चा बाजार माडंला आसताना स्वताचा जीव धोक्यात घालून अनमोल मद्दत ही मुले करत आहेत.


शिव,फुले,शाहु,आंबेडकर,आहिल्या,आण्णाभऊ साठेयाच्यां महाराष्ट्रात रयत संकटात आसताना मदत करनार्या  ह्या बहिण भाऊ डाॅ.प्रियंका,डाॅ प्रविण व त्याचें मित्र डाॅ. शुभम यांचे खुप खुप अभिनंदन व आभार.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा