टीम मंगळवेढा टाइम्स ।
कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असताना सोशल मीडियावर विविध घरगुती औषधांबाबत दावे करण्यात येत आहेत. यामध्ये कापूर, लवंग, ओवा, नीलगिरी तेल, वाफ घेणे, काढा, काळीमिरी, लवंग, लसून या पदार्थांचा विविध प्रकारे वापर करण्यास सांगितले जाते.
परंतु याच्या चुकीच्या वापराने आणि मात्राने शरीराचे नुकसान होऊन वेगळ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टमधील दाव्यांवर विश्वास ठेवू नका, सर्वप्रथम तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कापूरमुळे होऊ शकते नुकसान
कापूरमुळे बंद नाकाला दिलासा मिळतो किंवा ऑक्सीजनचा स्तर सुधारतो यास कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. उलट याचा जास्त वास घेणे धोकादायक ठरू शकते.
विशेषकरून मुलांसाठी. डब्ल्यूएचओनुसार कापूराचा जास्त वास घेतल्याने नाक, गळा आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. झटका येणे, भ्रम आणि पोटदुखी होऊ शकते.
लवंग
कोरोना व्हायरस वर लवंगेचा परिणाम होतो असे म्हटले जाते, परंतु हे चुकीचे आहे. लवंग, दालचीनी, जायफळ आणि तुळशीत युजेनॉल तत्व आढळते, जे विषारी मानले जाते. संशोधनात असे आढळून आलेले नाही की लवंग ऑक्सीजन लेव्हल वाढवते.
ओवा आणि नीलगिरी तेल:
कोणत्याही संशोधनात असे पुरावे मिळालेले नाहीत की, या दोन्ही गोष्टी ब्लड ऑक्सीजन वाढवतात. श्वासाचा त्रास याने दूर होत नाही.
वाफ घेण्याचा फायदा
सोशल मीडियावर हा सुद्धा दावा केला जात आहे की वाफ घेतल्याने नाक आणि घशातील कोरोना व्हायरस मरतो. मात्र तज्ज्ञ सांगतात की याचा कोणताही पुरावा नाही. उलट सतत वाफ घेतल्याने घसा आणि फुफ्फुसामधील नळीचे नुकसान होऊ शकते.
काढ्याचे नुकसान
काही लोक व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी काढा पित आहेत. मात्र, काळीमिरी, दालचिनी, जायफळ आणि सुंठ हे मसाले खुप गरम आहेत. जास्त मात्रा झाल्यास नुकसान होऊ शकते. पोटात जळजळ, तोंडात फोड येऊ शकतात.
लसून
लसून खाऊन सुद्धा कोरोना व्हायरसला मारता येते असा दावा काहीजण करतात. लसणातील एलिसिन तत्व इम्यून सेल्सला रोगांशी लढण्यासाठी ताकद देते.
मात्र, डब्ल्यूएचओनुसार, लसणातील तत्व कोरोनावर परिणाम करतात याचा कोणताही पुरावा नाही. आले, लसून यांची मात्रा जास्त झाल्यास ब्लीडिंगची समस्या होऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा